कृषी आधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्याच्या आर्थीक लुटेचा प्रकार उघड़ …कारवाई शुन्य …कृषी दुकानदाराला केवळ मागीतला जबाब…
बुलडाणा (प्रतिनिधी )
डी ए पी खत पाहिजे असेल तर इतर कंपनीचे खत लिंकमध्ये घ्यावेच लागेल अशी सक्ती शेतकऱ्याना करतांना, कृषी सेवा केद्र चालकाचा मनमानी प्रकार तालुका कृषी आधिकाऱ्याच्या डोळ्यासमोर घडल्यानंतर संबधीत कृषी दुकानदारला केवळ खुलासा जवाब मागीतल्याचा प्रकार बुलढाण्यात घडलाय .. कुंपणानेच शेत खाल्लं तर दाद मागावी कुणाकडे असाच काहीसा प्रकार तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांचा झालाय…..
पेरणीच्या तोंडावर कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याची तक्रार बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी येथील शेतकरी अजय शेवाळे यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली, तालुका कृषी अधिकारी दिनकर मेरत यांना सोबत चालण्याची विनंती केली शेतकरी आणि अधिकारी दोघेही बुलढाण्यातील सागर कृषी केंद्रावर पोहचले, त्यानंतर शेतकऱ्याने खताची मागणी केली असता तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या समक्ष शेतकऱ्याला आणखी दुसरे खत घ्यावेच लागेल अशी तंबी कृषी केंद्र चालकाने दिली ..त्यांनंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांना स्वतःचा परिचय दयावा लागला अशी माहिती तक्रार करते शेतकरी अजय शेवाळे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीना दिली . झालेला प्रकार गंभीर असल्याने ऑन दी स्पॉट कारवाई होणे अपेक्षित होती पण या अधिकारी महोदयांनी केवळ या प्रकरणाचा खुलासा जबाब कृषी सेवा केंद्राच्या संचालकांना मागीतला आहे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असताना या संदर्भात शेतकरी जर पुढे येत असेल तर कृषी विभागानी तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणे गरजे होते पण तसे काही झाले नाही… अर्थात ही कारवाई काही कारणासाठी तर तांबणीवर टाकण्यात आली नाहीना…?