- बोद्ध महासभा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी छाया जाधव
बुलडाणा( प्रतिनिधी) भारतीय बौद्ध महासभेच्या महिला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी येळगाव येथील छाया जाधव येळगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, *
संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर मार्गावरील महाबोधी बौद्ध विहारात कार्यकारिणी ची बैठक पार पडली, यावेळी जिल्हयातील पदाधिकारी, सदस्य हजर होते, या बैठकीत महिला आघाडी जिल्हा अध्यक्षपदी छाया जाधव यांची निवड करण्यात आली, यावेळी उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे निवडीबद्धल अभिनंदन केले,