रुग्णाची सेवा करतांना मनोधर्य वाढविणारा पती जन्मोंजन्मी मिळो..वाटसावित्री पौणीमानिमित्य आरोग्य महीला कर्मचांऱ्यांनी घातंल साकड…
: कोविड महामारीच्या संकट काळातही रुग्णांना आरोग्य सेवा देत असतानाच आपले मनोधैर्य वाढवणाऱ्यां पतीला दीर्घ आयुष्य लाभो आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळो असं साकडं आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने बुलढाणा येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी पूजाअर्चा करून केलंय
भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यामध्ये सुहासिनीच कुंक अबाधित राखणारा आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळू यासाठी वडाची पूजाअर्चा करून देवाकडे साकडे घालणारा सण म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाला सात प्रदिक्षणा घालून आणि वडाला धागा बांधून वडाची पूजा अर्चा करतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळू दे असं साकडं यावेळी घालतात …कोरोना संकट काळामध्ये रुग्णसेवा करत असताना घरच्या पतीनेच मनोधर्य वाढून नोकरी करण्यासाठी प्रेरणा निर्माण करून दिली त्यामुळेच आपण हजारो कोरोना रुग्णांचे जीव वाचू शकलो आपल्यालाही कोरोना झालेला असताना ज्यांनी आपली साथ सोडली नाही असा नवरा जन्मोजन्मी मिळो अशी प्रार्थना बुलढाणा येथील कोवीड सेंटरमध्ये रुग्णसेवा करणाऱ्या काही परिचारिकांनी कोवीड सेंटरच्या परिसरात असलेल्या वटवृक्षार्ची विधिवत पूजा-अर्चा करून हाच नवरा जन्म जन्म मिळू असे साकडे घातले त्यानंतर लगेच ऋग्नसेवा देण्यासाठी या महिला कामावर रुजू झाल्यात ….