बुलडाणा जिल्ह्यतील 44 हजारांवर मतदार वगळले…

0
121

बुलडाणा जिल्ह्यतील 44 हजारांवर मतदार वगळले….

बुलडाणा( प्रतिनिधी) साडे वीस लाखाच्या घरात पोहोचलेली जिल्ह्याची मतदारयादी आता काहीशी हलकी झाली आहे! कारण त्यातील तब्बल 44 हजार 646 जणांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे, यामध्ये सर्वाधिक म्हणजे 17 हजारावर नावे बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून वगळण्यात आली आहे, मात्र अखेरच्या टप्प्यात का होईना जागे झाल्याने साडेआठ हजारांवर मतदार बचावले आहे
1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकवर आधारित मतदारांची अंतिम यादी गत 15 जानेवरी 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती, यातील तब्बल 53 हजार 225 मतदारांची छायाचित्रे नसल्याचे व ते यादीत असलेल्या निवासस्थानावर राहत नसल्याचे आढळून आले, यामुळे त्यांना वारंवार सूचित करून छायाचित्र बीएएलओ वा तहसिल मध्ये जमा करण्यासाठी मुदत देण्यात आली, मात्र केवळ 8514 जनांनीच प्रतिसाद दिल्याने त्यांची नावे मतदार यादीत कायम राहिली, मात्र इतरांनी काहीच कारवाई न केल्याने अखेर तब्बल 44 हजारांवर मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली, *
जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, उप जिल्हाधिकारी भूषण अहिरे, भिकाजी घुगे यांच्या मार्गदर्शनात 6 एसडीओ व 13 तहसिलदारानी ही गुंतागुंतीची प्रक्रिया पार पाडली, बुलडाणा तहसीलमधील 17 हजारांवर मतदारांची वगळणी करण्याचे आव्हान एसडीओ राजेश्वर हांडे व तहसीलदार रुपेश खंडारे यांनी यशस्वीपणे पेलले! जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षाचे नायब तहसीलदार सुनील आहेर, एके नितीन बढे यांनी यात महत्वाची भूमिका बजावली,


*मतदारसंघ निहाय वगळणी*
बुलडाणा,,, 17 939
चिखली,,, 10076
सिंदखेडराजा,,, 6034
मेहकर,,, 1561
मलकापूर,,, 803,
खामगाव,,, 3074,
जळगाव,,, 5155

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here