सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासाठी* *पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पाठपुरावा*

0
228

*सिंदखेडराजा व इतर पर्यटनस्थळ विकासाठी*
*पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा पाठपुरावा*
*पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही*
*उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन*

 

मुंबई, दि.7; सिंदखेडराजा तसेच राज्यातील इतर पर्यटन स्थळ विकासासाठी अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे सातत्याने पाठपुरावा करित आहेत. आज याच संदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या समवेत बैठक झाली. या बैठकीला पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे,खासदार श्रीमती सुप्रीया सुळे, स्थानिक नेते ॲड नजीर काझी यांच्यासह सर्व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच संबधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यटनविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी अशी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलेली विनंती दोघांनीही मान्य केली असून पर्यटन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या स्थळाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. इथे 16 पर्यटनस्थळे आहेत त्यापैकी पाच स्थळे केंद्राच्या अखत्यारितील पुरातत्व विभागाकडे आहेत. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर म्हणून हे स्थळ ओळखले जाते. याशिवाय हिंदूराजे लखोजी राव यांचा राजवाडा, रंगमहाल, निळकंठेश्वर मंदीर यासाख्या स्थळांमुळे अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात.
औरंगाबाद जिल्ह्यातील अजंठा. एलोरा, दौलताबाद, व इतर पर्यटन स्थळांकडे असलेल्या सोयी सुविधांचा देखिल यावेळी आढावा घेण्यात आला. पर्यटन विकासासह वारसा जतन करण्यासाठी लागणारे सहकार्य भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला करण्यात येईल राज्याचे सहकार्य मिळेल अशी ग्वाही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली आहे.
***

25 सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे भेट देऊन सर्व स्थळांची पाहणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री मा ना डॉ राजेंद्र शिंगणेसाहेब यांनी येथील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी निधीची आवशकता असून यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पर्यटन मंत्री यांच्या समवेत बैठक घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती, त्यानुसार आज ही बैठक संपन्न झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here