पोखरी फाट्याजवळ विहिरीत आढळले महिलेचे प्रेत, 2 महिन्यापासून महिला होती बेपत्ता
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
दोन महिन्यांपूर्वी बुलडाणा तालुक्यातील भादोला येथून अचानक बेपत्ता झालेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आज १९ ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्या सुमारास बुलडाणा- खामगाव रोडवरील पोखरी फाट्याजवळ
एका विहिरीत आढळला. महिलेचे पतीने व मुलीने कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह सुंदरखेड येथील सौ. मनिषा मुरलीधर इंगळे वय ५५ या महिलेचा असल्याचे समोर आले आहे. त्या २६ ऑगस्ट रोजी भादोला येथून बेपत्ता झाल्या होत्या. बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मनिषा इंगळे बेपत्ता झाल्याची मिसिंग दाखल करण्यात आली होती. पोखरी फाट्याजवळ शेतात सोयाबीन सोंगणाऱ्या मजुरांना दुर्गंधी येत होती. त्यामुळे मजुरांनी पाहणी केली असता काठोकाठ तुडूंब भरलेल्या विहिरीत कुजलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या संबंधीची वार्ता पसरताच नागरिकांनी विहिरी जवळ एकच गर्दी केली होती. केवळ हाडांचा सांगाडा असलेल्या या मृतदेहाची ओळख पटविणे कठीण होते. मात्र अंगावरील कपड्यांवरून महिलेच्या पतीने आणि मुलीने ओळख पटविली. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.