देशाच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान सोहळा
*गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे,,* मायभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर देशाची सेवा करणाऱ्या माजी सैनिकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा बुलढाणा शहरातील तानाजी नगर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने आज 11 डिसेंबरला आयोजित करण्यात आला आहे
या सन्मान सोहळ्याला बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड जिल्हा शिवसेना प्रमुख जालींदर बुधवत उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मधुसूदन सावळे उपस्थित राहणार असल्याची माहिती तानाजी नगर सार्वजानिक उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे