बुडित क्षेत्रातील जमीन भूमाफियांनी विकली…….प्रहार संघटनेचे तलावात उपोषण..

0
250

बुडित क्षेत्रातील जमीन भूमाफियांनी विकली.. अतिक्रमण काढण्यासाठी प्रहार संघटनेचे तलावात उपोषण..
.
बुलडाणा तालुक्यातील धाड या गावाशेजारी असलेलं करडी धरण आहे. या धरणाच्या बुडीत क्षेत्रात 15 एकरवरील जमिन धाड गावातील भूमाफियांनी विक्री करीत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढली की सरळ धाड गावात पाणी शिरते, त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे, हे अतिक्रमण हटवावे ही मागणी मागील 4 वर्षापासून प्रहार संघटना करीत आहे. मात्र याकडे जिल्हा प्रशासन पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याच स्पष्ट झाले आहे. यामुळे करडी धरणात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज सोमवारी 10 जानेवारीपासून बोटीत बसून आमरण उपोषण सुरू केले आहे, जोपर्यंत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे ठोसआश्वासन देत नाही तोपर्यंत धरणात उपोषण सुरूच राहील असा पावित्रा प्रहार संघटनेने घेतला आहे
धरणातील अतिक्रमन तात्काळ काढावे या मागणी साठी हे आंदोलन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here