42 किलो गांजा जप्त …दोन आरोपी जेरबंद

0
263

  1. नाकेबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना एका गाडीमधून गांजा ची वाहतूक होत असल्याची बाब स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला निदर्शनास झाले या प्रकरणी पोलिसांनी 42 किलो गांजा जप्त केला असून दोघे जणांना जेरबंद केले आहेत मात्र दोघे जण या पथकाला चकमा देण्यात यशस्वी ठरले आहे याप्रकरणी पोलिसांनी अकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे

मराठवाड्यातील जाफराबाद येथील समाधान जाधव व रावसाहेब मलवत आणि त्यांचे दोन साथीदार असे चौघे जण mh 28 -az-0632 टाटा टिगोर कंपनीच्या वाहनाने देऊळगाव राजा येथून जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या रस्त्यावर नाकेबंदी करून वाहन तपासणी करताना गांजा ची वाहतूक होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे दरम्यान पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून सहा लाख रुपये किमतीचा 42 किलो गांजा तसेच वाहन मोबाईल इतर साहित्य असा एकूण अकरा लाखाचा ऐवज पोलीसांनी जप्त केला आहे या प्रकरणी दोघा जणाविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here