सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन केल्या तहसील कार्यालयात जमा .

0
253

*सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन केल्या तहसील कार्यालयात जमा .

*बुलडाणा* = सरकारी स्वस्त धान्य दुकानामार्फत वितरण करण्यात येणारे धान्य हे पारदर्शी ह्वावे या करिता शासनाने ई पॉस मशीन दिली आहे . परंतु काही दिवसांपासून ई-पॉस मशिनच्या तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे त्रस्त झालेल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील ई पॉस मशीन घेऊन मोर्चा काढून आज तहसील कार्यालयात जमा केल्या …

: स्वस्त धान्य दुकानदारानं देण्यात आलेले ई पॉस मशीन टू जी सपोर्टेड असल्याने आणि वेळोवेळी नादुरुस्त होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद विवाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. यासाठी राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारानी ३१ मार्च पर्यंत या अडचणीवर उपाय शोधावा अन्यथा १ एप्रिल २०२२ पासून सर्व दुकानदार आपल्या ई-पॉस मशिना आप-आपल्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात जमा करतील अशा आशयाचे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने जिल्हाधिकारी मार्फत शासनाकडे दिले होते

. त्यानुसार आज बुलढाणा जिल्ह्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्याकडील ई-पॉस तहसील कार्यलयाला जमा केल्या आहेत. तत्पूर्वी या ई-पॉस मशीनची तिरडीद्वारे मिवरवणूक काढण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here