सेवानिवृत्ती निमीत्त श्रीमती मिसाळ यांना साळीचोळी देवून निरोप
आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा समजून श्रीमती मिसाळ यांनी प्रामाणिक काम केले : डॉ. देवकर
बुलडाणा
धाड ग्रामीण रुग्णालयाच्या कक्षसेविका श्रीमती सुनंदा मिसाळ यांचा सेवानिवृत्ती निमीत्त रुग्णालयातील कर्मचा-यांच्यावतीने 8 जुलै रोजी साळीचोळी देवून सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.
बुलडाणा येथील श्रीमती सुनंदा मिसाळ या धाड ग्रामीण रुग्णालयात कक्षसेविका म्हणून या पदावर कार्यरत होत्या. त्यांच्या निरोप सोहळयाला प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य अधिकारी डॉ.निवृत्ती देवकर हे उपस्थित होते. यावेळी त्यांच्याहस्ते श्रीमती सुनंदा मिसाळ यांचा साळीचोळी देवून सत्कार करण्यात आला. या सत्कार व निरोप समारंभाला उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. देवकर म्हणाले की, आरोग्य विभाग हे रुग्णांकरीता देवालय आहे. ज्यावेळी रुग्ण आजारी असतो त्यावेळी त्यांचा उपचार करणारे डॉ. परिचारीका व इतर कर्मचारी त्यांच्याकरीता देवा प्रमाणे असतात. डॉक्टर व कर्मचा-यांनीसुध्दा रुग्णांचीच सेवा ही ईश्वरसेवा समजून कामे करावी. आजारी असलेल्या रुग्णाला औषधीपेक्षाही त्याला धिर देण्याची गरज असते, असे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या 58 वर्ष श्रीमती सुनंदा मिसाळ यांनी आरोग्य विभागात विविध पदावर आपले काम जबाबदारी व निष्ठेने पार पाडले. कोविड काळात त्यांनी अहोराञ आपल्या जीवाची परवा न करता रुग्णांची सेवा केली. निवृत्ती नंतर कर्मचा-यांकडून त्यांचा होत असलेला सत्कार हीच त्यांच्या प्रामाणिक कामाची पावती आहे, असे डॉ. देवकर म्हणाले. यावेळी डॉ. सुर्यवंशी, सहाय्यक अधिक्षक सरकटे, परिचारीका स्वाती खेडेकर, चौधरी, परिचारीका सपकाळ, हिंगे, लॅब असिस्टटन्ट जाधव, सतीष पाटील, देशपांडे, डिगंबर हतागडे, सुनिल दांडगे, योगेश तायडे, सैय्यद वहीद, शेख सिराज, संतोषी जाधव, शांताबाई अहिल्ले यांच्यासह कर्मचारीवृंद उपस्थित होते.