भाजपाचे अंतर्गत वाद चोहाट्यावर …मुद्द्याची लढाई गुद्द्यावर… मेहकारात झाली तुफान हाणामारी… तीन जण जखमी…

0
289

 

देशात भाजपा विजयाचा जल्लोष करत असतानाच बुलढाण्यात जिल्ह्यात मात्र भाजपाच्या दोन गटांमध्ये तुफान राडा होऊन एकमेकांची डोकी भाजप कार्यकर्त्यांनी फोडली आहेत.. ही हाणामारी अंतर्गत नियुक्ती होऊन गटतटाचे राजकारण मुद्द्यावरून गुद्यापर्यंत गेलाय बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील भाजपा विधानसभा संपर्क कार्यालयामध्ये हा तुफानी राड़ा झालाय…भाजपाचे जिल्हाध्यक्षांनी गणेश मांन्टे यांनी नव्याने मेहकरचे तालुका अध्यक्ष म्हणून सारंग माळेकर यांची नियुक्ती केली होती हा राग मनात ठेवून माजी तालुकाध्यक्ष शिव ठाकरे जिल्हाउपाध्यक्ष प्रल्हाद लष्कर यांनी भाजपा संपर्क कार्यालयात येऊन त्या ठिकाणी पत्रकार परिषद सुरू असतानाच भाजपाचे मेहकर विधानसभा संपर्कप्रमुख प्रकाश गवई अर्जुन वानखेडे नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर जबर मारहाण केली देशामध्ये भाजपाचे विजयाचा जल्लोष साजरा करून फटाके फोडले जात असतानाच बुलढाण्यात मात्र भाजपाच्या दोन गटांमध्ये तुफान राड़ा झाला या दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीत तीन कार्यकर्ते जबर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर हाणामारीच प्रकरण पोलीसापर्यत गेल्याची प्राथमिक माहिती आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here