विज वाहिनी निरीक्षणासाठी आलेल्या पथकाला जीवे मारण्याची धमकी देत अश्लील शिवीगाळ, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

0
36

बुलढाणा- महावितरणच्या खामगाव ग्रामीण उपविभागात शिरजगाव देशमुख येथे कार्यरत वरिष्ठ तंत्रज्ञ चिरंजीलाल जाधव हे आपल्या सहकाऱ्यांसह जनता नगरमधील वीज वाहिनीचे निरिक्षण करण्यासाठी गेले असता, पथक निरिक्षण करत असतांना शेरूखान हा किराणा दुकानातून काठी घेवून चिरंजीलाल जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांना मारण्यासाठी धावून गेला, तसेच पथकाला अश्लिल शिवीगाळ केली, सदर वाद सुरू असतांना आणखी तिघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला, या प्रकरणी चिरंजीलाल जाधव यांनी खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांनी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here