बुलडाणा (प्रतिनिधी)
पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागच्यावतीने 20 ते 22 फ्रेवुवारी ला महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे करण्यात आले आहे . या महोत्सवाचे उद्घाटन 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वा वने ,सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या होणार आहे.यावेळी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि जिल्ह्यातील आमदर उपस्थित राहणार आहेत
शाहिर डी. आर. इंगळे यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे . त्यानंतर ‘नक्षत्रांचे देणे’ कार्यक्रमात गायक ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी हे सुधीर फडके आणि आशा भोसले यांची मराठी, हिंदी गाणी सादर करतील. कार्यक्रमापूर्वी ढोलताशा पथकाचे सादरीकरण होणार आहे ..या कार्यक्रमात शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल आणि महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंची प्रदर्शनी व विक्री जाणार आहे .