हजारो नागरिकांच्या उपस्थितीत प्रचंड शक्ती प्रदर्शन करत संदीप शेळके यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज

0
111

बुलडाणा ( प्रतिनिधी )

बुलढाणा लोकसभा मतदार संघासाठी वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत, आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय, यावेळी महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली, दरम्यान बुलढाणा शहरातून शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली, खरं तर काल महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता,

तेवढीच नागरिकांची गर्दी आज देखील पाहायला मिळाल्याने बुलढाणा लोकसभेच्या निवडणुकीत काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here