निवडणूक   लोकसभेची आणि पेरणी  विधानसभेची…. नाट्यमय  राजकारण…
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला उमेदवारी अर्ज दाखल करून सुरुवात झाली आहे. ही निवडणूक लोकसभेसाठी असली तरी विधानसभेच्या उमेदवारांनी लोकसभेसाठी अर्ज   दाखल केल्याचं दिसून आल. त्यामुळे “*निवडणूक लोकसभेची आणि पेरणी विधानसभेची*” असं म्हटल्यास वावग ठरणार नाही त्याला कारण ही तसंच आहे…….
बुलढाणा विधानसभेचं नेतृत्व करत असलेले आमदार संजय गायकवाड यांनी मतदारसंघात कामाचा धडाका लावून आपल्या कर्तुत्वाची झलक संपूर्ण जिल्ह्यालाच दाखवून दिली ..कोरोनाचा काळ वगळता गेल्या अडीच वर्षांमध्ये बुलढाणा शहराचा तर त्यांनी नकक्षा बदलून टाकला..आमदार साहेबांना हे सर्व शक्य झालं ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केलेल्या उठावामुळे… उठाव वेळी संजूभाऊ हे एकनाथरावांच्या खांद्याला खांदा लावून त्यावेळची परिस्थिती हाताळत होते. त्यामुळेच ते मुख्यमंत्र्यांचे उत्तम सहकारी ही बनले. संजू भाऊ म्हणतील ते कामे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात होऊ लागली. करोडो रुपयांचा विकास निधी आणल्या गेला. आणि जनतेच्या आग्रहास्तव संजू भाऊंनी जिल्ह्याचे नेतृत्व करण्याच्या दृष्टिकोनातून लोकसभेचा अर्ज भरला…सर्व न्युज चॅनलवर बातम्या झळकल्या .. संजु भाऊचा  “अर्जबॉम्ब ” हा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची डोकेदुखी वाढल्याचं काही जाणकार त्यावेळी बोलत होते… भाजपा आणि शिवसेना यांच्यातील जागावाट्याचं गुराळ सुरूच असताना.. शिवसेनेत पक्षांर्गत कलह वाढल्याचे चित्र दर्शवुन पहिली यादी जाहीर करत उमेदवारांना वाट मोकळी करून दिली… या यादीमध्ये प्रतापराव जाधव यांना पुन्हा चौथ्यांदा लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली…  . हा सर्व प्रकार म्हणजे एक  पॉलिसी मॅटरचा भाग असल्याचं बोलल्या जात आहे.    यातूनच असं लक्षात येतं की या पॉलिसी मॅटरमुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे उमेदवारांची यादी जाहीर करून काहीसे तणाव मुक्त झाले… संकट मोचन म्हणून संजय भाऊची भुमिका महत्वांची ठरली … एकनाथरावांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत भाऊनां नक्कीच होणार आहे …
*विजयराज शिंदेचा जमत नव्हता राजकीय मेळ …  लोकसेभेत त्यांनी केला खेळ* ….
2019 च्या  लोकसभा निवडणुकीत
खा प्रतापराव जाधव निवडून येत नाही असं सांगूनच माजी आमदार विजयराज शिदे यांनी विरोधात भूमिका घेतली . पक्षाने प्रतापरावांना तिसऱ्यांदा तिकीट दिलं आणि शिंदेना अमरावती पाठवलं  तेथुन ही प्रतापरावच्या विरोधी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला .या निवडणुकीत एक लाखाच्यावर मताधिक्य घेवून प्रतापराव निवडून आले …त्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत विजयराज शिदेचं  तिकीट कापण्यात आलं आणि संजय गायकवाड देण्यात आलं.. अशा परिस्थितीत शांत बसतील ते विजयराज कसले .. त्यांनी शेवटच्या दिवशी दुसऱ्याच्या नावांन घोषीत झालेल वंचितच तिकीट स्वतःच्या नावे करुण घेतल…विधानसभा निवडणुकीत प्रतिष्ठान पणाला लावली.. लोकनेता म्हणून मिरविणाऱ्यां शिदेना  निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला… विधानसभेच्या निकालानंतर भाजप शिवसेना युती तिढा निर्माण झाला. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत हात मिळवणी करत मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं… भाजपाला सत्तेच्या बाहेर राहावं लागलं.
भाजपा सारख्या मोठ्या पक्षात आपल्याला आमादर बनण्याची पुन्हा संधी मिळू शकते हे पाहुन त्यांनी वंचितला सोडचिठ्ठी देवुन  भाजपात उडी घेतली …शिवसेना आणि प्रतापरावांना घेरण्यासाठी भाजपाने शिंदेंना लोकसभा समन्वयकाची जबाबदारी दिली..  शिवसेनेच्या उठावानंतर राज्यात    शिवसेना-भाजपाची सत्ता आली. सत्तेत  शिवसेनेचे खासदार आणि दोन्ही आमदार सहभागी झाले आणि बुलढाणा जिल्ह्याच राजकीय चित्र बदल.. भाजपातील माजी आमदार शिदेंची मोठी गोची झाली. आणि त्यांची   आमदारकीची अशा निराशेत परावर्तित झाली.. कारण युतीमध्ये विधानसभा शिवसेनेकडे आहे .. वादग्रस्त विधानामुळे संजू भाऊ ही चर्चेत आहे… या लोकसभेत राज्यातील शिवसेनेच्या विद्यमान  खासदारां ची तिकीटे जशी  कापल्या गेलीत  यात भाजपाचा  हात असल्या बोलल्या जातेयं.. यानंतर विधान सभेच्या निवडणुका होणार आहे.  हे लक्षात घेवून विजयराज शिदे  त्यांनी राजकीय उपद्रवीमूल्य दाखवण्यासाठी लोकसभेत बंडाचा झेंडा उभारून अर्ज दाखल  केला.भाजपा पक्षश्रेष्ठींनी त्यांचं बंड आश्वासन देऊन थंड केलं..या राजकीय नाट्यमय घडामोडींमुळे निवडणुक    लोकसभेची आणि पेरणी  विधानसभेची असंच म्हणावं लागेल..
*प्रा. युवराज वाघ बुलडाणा 9422884610*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here