बुलडाणा जिल्हयातील पळसखेडचक्काचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांना विरमरण …

0
111

बुलडाणा जिल्हयातील पळसखेडचक्काचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे यांना विरमरण …

बुलडाणा प्रतिनिधी

बुलडाणा जिल्हयातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेडचक्का येथील महार रेजिमेंटचे जवान प्रदीप साहेबराव मांदळे हे काश्मीर मध्ये आपले कर्तव्य बजावताना असतांना द्रास टायगर हिल भागात अंगावर बर्फाचा ढीग पडून त्यांना वीरमरण आले.

वीर जवान प्रदीप मांदळे यांना विरमरण झाल्याची माहिती बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला 15 डिसेंबरला रात्री कळविण्यात आली. औरंगाबाद येथे त्यांची वीरमाता शिवनंदाताई गंभीर आजारामुळे भरती असताना या धक्कादायक घटनेने हे कुटुंब अक्षरशः हादरले. याची खबर गावात पसरताच पळसखेड चक्का गावातील राहिवासी देखील गहिवरले. वडील साहेबराव मांदळे यांनी मोलमजुरी करून मोठा पुत्र प्रदीप, संदीप व सैन्यातच कार्यरत आहे त्यातील प्रदीप 2008-09 मध्ये लष्करात भरती होऊन महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला जवान प्रदीप मांदळे हे गत ऑगस्ट महिन्यात 15 दिवसांच्या सुटीवर गावी आले होते. त्यांनी आपल्या कुटुंबासह ती अल्प सुटी घालविली. मात्र ती भेट शेवटची ठरेल अशी कुणी कल्पनाही केली नसेल, पण दुर्दैवाने ती अखेरचीच भेट ठरली जवान प्रदीप यांच्या पश्चात पत्नी कांचन मुलगा सुरज, सार्थक, जयदीप हे मुले आहेत त्यांचे पार्थिव 20 डिसेंबर रोजी पळसखेड चक्का येथे आणण्यात येणार आहे त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here