आपसी मतभेद विसरुण ग्रामविकासासाठी नवनिवाचीत ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न करा महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर

0
76

आपसी मतभेद विसरुण ग्रामविकासासाठी नवनिवाचीत ग्रामपंचायत सदस्यांनी प्रयत्न करा महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर

चिखली पतिनिधी
: नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आपसी मतभेद विसरून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार ग्रामविकासासाठी पैसा कमी पडू देणार नाही असी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे केले

बुलढाणा जिल्ह्यातील 527 स ग्रामपंचायतीच्या निवडणुकापैकी 29 ग्रामपंचायतीच्या निवडणूका अविरोध झाल्या तर उर्वरित 498 ग्रामपंचायती साठी निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळा महाविकास आघाडीच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाला यावेळी व्यासपीठावर बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे आमदार राजेश एकडे माजी आमदार राहुल बोंद्रे हर्षवर्धन सपकाळ जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रास्ताविकातून माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखली तालुक्यात आणि जिल्ह्यात महा विकास आघाडीचे जवळपास 80 टक्के ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहे परंतु विरोधी पक्षाच्या आमदार श्वेता महाले खोटे बोलत असून त्यांनी वर्तमानपत्रांमध्ये ज्या ग्रामपंचायती सदस्य आपली असल्याचा दावा केला आहे त्यासंदर्भात वर्तमानपत्रांना माहिती दिली त्या गावच्या ग्रामपंचायत सदस्यांना बोलून भर सभेमध्ये उभे करून आपण कोणत्या पक्षाचे आहात भाजपा की महा विकास आघाडीचे सदस्य आहात असा थेट प्रश्न करून त्या ग्रामपंचायत सदस्य करूनच आपण भाजपाचे नसल्याचा खुलासा करून घेतला
अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले की ग्रामपंचायत निवडणूक ग्रामपॅनेलच्या माध्यमातून लढविल्या जात असल्यामुळे या निवडणुकीमध्ये पक्षाचा संबंध येत नाही अनेक लोक आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त निवडणूक विजयी झाले असा दावा करत आहे परंतु मी तसा दावा करणार नाही असे सांगून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जास्तीत जास्त पैसा ग्राम विकासाच्या दृष्टीकोनातून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली यावेळी त्या सत्काराच्या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

*Yuwaraj wagh buldana*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here