Home आपला जिल्हा अमरावती विभागातील सिचंनाचा अनुशेष दुर करण्यासाठी रखडलेल्या सिचंन प्रकल्याचे काम त्वरेने पुर्ण...

अमरावती विभागातील सिचंनाचा अनुशेष दुर करण्यासाठी रखडलेल्या सिचंन प्रकल्याचे काम त्वरेने पुर्ण करणार …जलसंपदामंत्री जयंत पाटील*

0
97

अमरावती विभागातील सिचंनाचा अनुशेष दुर करण्यासाठी रखडलेल्या सिचंन प्रकल्याचे काम त्वरेने पुर्ण करणार …जलसंपदामंत्री जयंत पाटील*

अमरावती विभागामध्ये सिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात असून या भागातील रखडलेले जलप्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आपण आढावा घेऊन प्राधान्यक्रमाने हे प्रश्न सोडणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बुलढाणा येथे केले

बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जलसंपदा विभागाची आढावा बैठक आज त्यांनी घेतली त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते म्हणाले की बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेला जिगाव प्रकल्पाला दरवर्षी विशेष निधी मिळावा यासाठी आपण स्वतः राज्यपालकडे मागणी केली आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील जलसिंचनाचा अनुशेष मोठ्या प्रमाणात दूर होईल व त्याचा लाभ इतर जिल्ह्यानाही होणार आहे तसेच गेल्या पाच सहा वर्षांमध्ये अमरावती विभागांमध्ये सिंचनाची कामे पाहिजे त्या प्रमाणात झाली नाहीत ही वस्तुस्थिती आहे तेव्हा अमरावती विभागातील रखडलेले प्रकल्प त्वरेने पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आपण जिल्हानिहाय बैठका घेऊन त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे उपस्थित होते

*Yuwaraj wagh buldana*

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here