Home आपला जिल्हा शेगाव पंचायत समितीचे शाखा अभियंत्याला 7 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने केले...

शेगाव पंचायत समितीचे शाखा अभियंत्याला 7 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने केले जेरबंद

0
98
  • शेगाव पंचायत समितीचे शाखा अभियंत्याला 7 हजाराची लाच घेताना एसीबीच्या पथकाने केले जेरबंद

हाय मॅक्स विद्युत बॉलचे बिल काढण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना शेगाव येथील पंचायत समिती बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पुरुषोत्तम गायकवाड यांना 7 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्यांना जेरबंद केल

शेगाव तालुक्यातील सांगवा  गट ग्रा पं अंतर्गत  सन 2019 20 मध्ये अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत हायमस्ट लाईट लावण्याचे काम घेण्यात आले होते. सदर काम सन 2020 मध्ये पूर्ण झालेले असतांना केलेल्या कामाचे बिल 1 ,43,700 रुपयांचे 5% म्हणून 7,500/- रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.याबाबत संबंधित कंत्राटदार अनिल घाटे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांचेकडे तक्रार दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून तडजोडी अंती 7000/-रुपये  लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने  पुरुषोत्तम पांडुरंग गायकवाड, वय-  57 वर्षे,  पंचायत समिती शेगाव शाखा अभियंता ,( वर्ग -3), यांना रंगेहाथ पकडले त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

*Yuwaraj wagh buldana*

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here