किन्होळा गाव कोरोनामुक्त झाल्याची गावकऱ्यांनी केली घोषणा*

0
129

*किन्होळा ग्रमास्यांनी एकजुटीने मिळविला कोरोनावर विजय!* *किन्होळा गाव कोरोनामुक्त झाल्याची गावकऱ्यांनी केली घोषणा*

– ‘गाव करी ते राव न करी’ ही म्हण किन्होळावासीयांनी प्रत्यक्ष कृतित उतरवून गावकरी एकीच्या बळातून कोणतेही ‘लक्ष्य’ साध्य करू शकतात हे सिद्ध केले आहे. ग्रामस्थांनी एकजुटीने लढा देऊन कोरोनाला हद्दपार केले. आपले गाव कोरोनामुक्त झाल्याची घोषणाच गावकऱ्यांनी रविवारी बैठकीच्या माध्यमातून केली.
बुलडाणा जिल्हयातील किन्होळा येथे ग्रामस्थाने कोविड आयसोलेशन सेंटर उभारल्याने ही लढाई जिंकता आली,

बुलडाणा जिल्हयातील किन्होळा या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना गावातच कोविड आयसोलेशन सेंटर उभारण्याची संकल्पना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मांडली होती गावकऱ्यांनी या संकल्पनेला भरभरून दाद देत गावात मध्येच कोरोना सेंटर सुरू केले
कोविड आयसोलेशन सेंटरमधून ३ जून रोजी एक शेवटचा कोरोनाग्रस्त रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी परतला. गेल्या दहा दिवसांपासून एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नाही. दरम्यानच्या काळात स्वयंसेवक व शिक्षकांनी घर टू घर जाऊन सर्वेक्षण केले. ग्रामस्थांची कोरोना चाचणी करवून घेण्यात आली. तसेच आजारांचे सर्वेक्षण करण्यात आले. सद्यस्थितीत गावातील एकही व्यक्ती कुठेच दवाखान्यात भरती नाही. कुणाला कोरोनासदृश लक्षणे नाहीत. ग्रामस्थांनी तन, मन आणि धनाने कोरोनाला हरविल्यानंतर रविवारी बैठक घेण्यात आली. यावेळी विजयाची खुण दाखवून गावकऱ्यांकडून आनंद व्यक्त करण्यात आला.
लोकसहभागातून ३ मे रोजी किन्होळा आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले होते तेंव्हापासून ३ जूनपर्यंत महिनाभराच्या कालावधीत ५० रुग्ण येथे बरे झाले. खेळीमेळीचे वातावरण, प्रबोधन आणि विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात आल्याने रुग्णांचे मनोबल वाढले. त्याचाच सकारात्मक परिणाम म्हणून रुग्ण कोरोनावर तात्काळ मात करू शकले. कोरोनामुक्तीच्या घोषणेनंतर ‘किन्होळा गाव – कोरोनामुक्त गाव’, ‘किन्होळा गावकऱ्यांचा विजय असो’ अशा गगनभेदी घोषणा देत कोरोनामुक्तीबद्दल जल्लोष करण्यात आला.
किन्होळा हे ७ हजार लोकसंख्येचे गाव आहे. सर्वजण एकदिलाने कोरोना लढाईत उतरले आणि महिनाभरातच अदृश्य शत्रूविरुद्धचे युद्ध जिंकण्यात गावकरी यशस्वी ठरले. सेंटरच्या उभारणीनंतर गावात कोरोनाने एकही मृत्यू झाला नाही. प्रशासनस्तरावर नव्हेतर खुद्द गावकऱ्यांनीच गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या आगळ्यावेगळ्या कोविड आयसोलेशन सेंटरच्या माध्यमातून व्हायरसविरुद्धची मोहीम फत्ते करण्यात आली

कोरोनाला हद्दपार केले असलेतरी संभाव्य तिसरी लाट पाहता हे कोविड सेंटर सुरुच ठेवण्यात आले आहे. तेथे ५० स्वयंसेवक कार्यरत आहेत. एकोप्याने कोणत्याही संकटावर मात करता येऊ शकते, हे किन्होळा ग्रामस्थांनी एकजूट राहून दाखवून दिले आहे. आपण संकल्पना मांडली आणि क्षणात त्याला अख्ख्या गाववासीयांनी होकार देत सेंटर सुरू केले. ग्रामस्थांच्या एकीचा खऱ्या अर्थाने हा विजयच म्हणावा लागेल. आता कोणत्याही संकटाला टक्कर देता येईल, असा आत्मविश्वास ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाल्याची प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी व्यक्त केली.

*दीड लाखाचा निधी शिल्लक…*

शासनाच्या व नेत्यांच्या आर्थिक मदतीशिवाय गावकऱ्यांनी साडेचार लाखाचा निधी उभारला त्यापैकी तीन लाख कोविड सेंटर व रुग्णांसाठी खर्च झाला व अजून गावकऱ्यांकडे दिड लाखांचा निधी शिल्लक असून हा निधी तिसऱ्या लाटेच्या आपत्तीचा सामना करण्यासाठी वापरता येईल असे प्रभू बाहेकर यांनी सांगितले.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here