कामगार कल्याण कार्यालयासमोर कामगारांची अर्ज जमा करण्यासाठी तोबा गर्दी…. काेरोना नियमांचे उल्लंघन…*

0
313

*कामगार कल्याण कार्यालयासमोर कामगारांची अर्ज जमा करण्यासाठी तोबा गर्दी…. काेरोना नियमांचे उल्लंघन…*

कामगारांचे अर्ज जमा करण्यासाठी प्रशासकीय इमारतीतील कामगार कल्याण विभागाच्या कार्यालयासमोर मजुरांची प्रचंड गर्दी निर्माण झाली होती या कार्यालयापासून लांबच लांब रांगा लागल्या होत्या कोठेही सामाजिक अंतर न राहता कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्या जात होते दरम्यान लांबच लांब रांगा आल्यामुळे प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी या ठिकाणी आल्यानंतर मात्र कामगार अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी स्वतःच्या अर्जावर मोबाईल नंबर नोंद करा असं सांगून सर्व कामगारांचे अर्ज जमा करून घेतले व नंतर त्यांना घरी जा आम्ही तुम्हाला नंतर यानंबर फोन करू अशा सूचना दिल्या एकंदरीत कोरोना संपला की काय असं चित्र प्रशासकीय इमारतीमध्ये सकाळी बघावयास मिळाला
राज्य शासन आणि प्रशासन गर्दी टाळा असं वारंवार आव्हान करत असतानाच दुसरीकडे मात्र प्रशासनाचा एक भाग असलेल्या कामगार कल्याण विभागाकडून मात्र या आव्हानाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र 21 जून चा सकाळी प्रशासकीय इमारतीच्या पारिसरातील गर्दीवरून दिसून आली ही गर्दी माध्यमांच्या प्रतिनिधींच्या दृष्टीत आल्यानंतर मात्र या विभागाचे अधिकारी जागे झाले व त्यांनी सावरासावर करत सर्व कामगारांचे अर्ज जमा करून घेतले व त्यांना इथून निघून जाण्याच्या सूचना केल्या…. मात्र तेथील गर्दी काही कमी होत नव्हती असंच चित्र दिसून आलं कामगार मात्र पाच पाच सहा सहा सहा सहा च्या घोळक्याने बसल्याचे चित्र दिसुन आलं….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here