मढ ते धामणगाव व जनुना फाटा ते जनुना रस्ताचे भूमीपूजन
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्ग मढ फाटा ते धामणगाव (२ कोटी रु.) व जनुना फाटा ते जनुना रस्ता (१कोटी २१.१८ लक्ष) मजबुतीकरण व डांबरीकरण भूमीपूजनाचा कार्यक्रम आज दि. २.६.२०२१ रोजी बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मौजे जनुना, मढ, गुम्मी, तराडखेड, मासरूळ, धामणगाव गावात मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पं स उपसभापती पती श्रीकांत पवार, पं स सदस्य दिलीप सिनकर, पं स मा सभापती सुधाकर आघाव, तालुका प्रमुख लखन गाडेकर, उप तालुका प्रमुख विजय इतवारे, अमोल शिंदे, संजय पाटील, वै आ ता प्रमुख डॉ अरुण पोफळे, ओमसिंग राजपूत, गजानन धंदर, संदीप पालकर, राजु पालकर यांच्यासह गावातील विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, यु से शाखा प्रमुख सरपंच, उप सरपंच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.