किनगाव राजा येथे कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यामध्ये विकेंड लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी !! . साखरखर्डा ,मलकापूर पांग्रा आदी सह सर्वत्र कडकडीत बंद …..
लोकांनी काळजी घ्या मास्क वापरा तहसीलदार सुनील सावंत यांचे याआवाहन !!
…महसूल . आरोग्य यंत्रणा अलर्ट वर !!
सिंदखेडराजा
महाराष्ट्र शासनाने तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी खडक उपाययोजना केली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्यात शनिवार आणि रविवार ला कडक लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आलेली आहे कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना सिंदखेडराजा तालुक्यातील किनगाव राजा येथे दिनांक दोन जुलै रोजी एकाच गावांमध्ये कोरोना चे 17 रुग्ण आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती याची दखल घेत तहसीलदार सुनील सावंत यांनी तालुक्यात कडक लॉक डाऊन करण्याचा सूचना संबधीत यंत्रेनेल्या दिल्या असून महसूल यंत्रणा पोलीस प्रशासनाच्या वतीने तालुक्यात साखरखेर्डा मलकापूर पांग्रा यासह अनेक गावात शनिवार-रविवार विकेंडला अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला यावेळी रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट दिसत होता
किनगाव राजा येथे अचानकच कोरणा पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढल्याने महसूल विभाग व प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागे होऊन .रविवार शनिवार या दोन दिवशी सिंदखेडराजा तालुक्यामध्ये लॉक डाऊन ची कडक अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे . .तालुक्यातील साखरखेर्डा मलकापूर पांग्रा येथे शनिवारी आणि रविवारी सकाळपासून संचारबंदी दृश्य स्थिती आढळूनआली सर्व दुकाने दवाखाने मेडिकल वगळता पूर्णपणे बंद होती .तसेच साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र अडोळे आणि त्यांचे सर्व पोलिस कर्मचारी स्वतःफिरून परिस्थितीचा आढावा घेत होते तहसीलदार सुनील सावंत यांनी संपूर्ण तालुक्यात फिरून कडक लॉक डाऊन करण्याचे निर्देश देत होते
नागरिकांनी अजूनही काळजी घेण्याची आवश्यकता आहे . हाताला सॅनिटायझर . तोंडाला माक्स व गर्दीत जाणे शक्यतो टाळावे असे आवाहन तहसीलदार सुनील सावंत यांनी केले असून अजूनही धोका संपलेला नाही काळजी घ्या असं त्यांनी सांगितले. :किनगाव राजा येथे अचानकच कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढल्याने सिंदखेडराजा तहसीलदार सुनील सावंत व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र कुमार साळवे यांनी तातडीने किनगावराजा येथे जाऊन .संपर्कात आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांनी टेस्ट करण्यात आली यावेळी रुग्णांच्या लिरिक्स व लोरेक्स मधील नागरिकांचे वर्गीकरण करून rt-pcr टेस्ट करण्याचे आवाहनही यावेळी तहसीलदार सुनील सावंत यांनी केले .
तसेच पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या घरी जाऊन विचारपूस करण्यात आली परंतु पॉझिटिव्ह रुग्णांना कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाही तरी ही खबरदारी म्हणून त्यांना सिंदखेड राजा येथील कोविड सेंटरमध्ये भरती होण्याच्या सूचना देण्यात आल्या नागरिकांनी सुद्धा सूचनांचे पालन करून स्वतः सेंटर सिंदखेडराजा इथे भरती होण्यासाठी ॲम्बुलन्स मध्ये रवाना झाले …..
.