गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने केले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन
केंद्र सरकारने गॅस दरवाढ केल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबीयांचे कंबरडे मोडले असून याकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करूण या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून गॅस सिलेंडर ला पुष्पमाला अर्पण करून या दरवाढीचा निषेध केला आहे
केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढ सोबतच एक जुलैला स्वयंपाकाच्या गॅस दरातही पंचवीस रुपयांनी वाढ केली या दरवाढीचा परिणाम महागाई वाढीवर होत असून केंद्र सरकारने ही दरवाढ तत्काळ रद्द करावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनाला मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी बुलढाणा विधानसभा अध्यक्ष नरेश शेळके जिल्हा परिषद सदस्य डि एस लहाने यांच्यासह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुजा सावळे लक्ष्मी शेळ्के व इतर सदस्य सहभागी झाले होते यावेळी केंद्र सरकारच्या दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला घोषणाबाजी करण्यात आली