क्रांती दिनापासुन विदर्भ राज्य आंदोलन समिती वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी करणार आंदोलन…..माजी आमदार वामनराव चटप*

0
108

*क्रांती दिनापासुन विदर्भ राज्य आंदोलन समिती वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी करणार आंदोलन…..माजी आमदार वामनराव चटप

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]


  • बुलडाणा : : स्वतंत्र विदर्भ राज्यांची निर्मिती त्वरित करावी , कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारे भरावे, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ त्वरित मागे घ्यावी या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी नागपूर येथील विदर्भ चंडिका मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. वामनराव चटप यांनी बुलढाणा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली

विदर्भ राज्याच्या निर्मितीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 9 ऑगस्ट पासून नागपूर येथील शहीद चौक विदर्भ चंडिका मंदिरात येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे अशी माहिती वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या विदर्भाची मागणी आहे परंतु त्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. काेरोना महामारी मध्ये उद्योग व्यापार व्यवसाय बंद असताना मोठ्या प्रमाणात वीज बिल देण्यात आले आहेत हे विज बिल सरकारने भरावे किवा 200 युनिटपर्यत वीज बिल फ्री करून नंतरचे विज अर्ध करावेत अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक अडचणीत सापडले आहेत त्यांना दिलासा देण्यासाठी ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी ही या आंदोलनामध्ये केली जाणार आहे या आंदोलनामध्ये विदर्भ राज्यातील सर्व जिल्ह्यातील विदर्भ राज्य आंदोलन समिती सदस्य सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी माजी आमदार वामनराव चटप यांनी पत्रकार परिषदेत दिली

*Yuwaraj wagh buldana*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here