*अतिवृष्टीनेबाधीत झालेल्या कुटुंबीयांना शिवसेनेतर्फ मदतीचा हात..अन्न धान्य इतर अत्यावश्यक वस्तु घेवुन 13 एस टी बस रवाना …*
– कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली आहे अनेक लोक बेघर झाले आहेत तर अनेकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू वाहून गेले आहेत अशा आपदग्रस्तांना मदतीचा हात म्हणून बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने 1400 किक्टल अन्नधान्य व इतर वस्तूं घेवुन आज 29 जुलैला एस टी महामंडळाच्या 13 गाडया रवाना करण्यात आल्या खासदार प्रतापराव जाधव यानी या गाडयांना हिरवी झेडी दाखविली यावेळी जिल्हयातील आमदार संजय रायमुलकर संजय गायकवाड जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत उपस्थित होते ..
बुलडाणा जिल्ह्यातील शिवसैनिकांनी एका दिवसात 1400 क्विंटल धान्य आणि किराणा साहित्य गोळा केले आहे, ज्यामध्ये गहू ,तांदूळ, आटा , डाळ, तेल, मीठ, यासह यातील सर्व साहित्य घेऊन 50 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचे साहित्य एसटी महामंडळाच्या 13 बसेसमध्ये चीपळून साठी आज मेहकर येथून रवाना झाल्या आहेत… ही मदत एका दिवसात केवळ शिवसैनिकांनी केली असून, येत्या काही दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून देखील पुन्हा एकदा भरीव मदत पाठवणार असल्याचे यावेळी खासदार जाधव यांनी सांगितले..
– तर आज खासदार जाधव यांच्या भावाच्या मुलाचे लग्न असूनही खासदार यांनी लग्नाला महत्व न देता अगोदर पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरविले.. त्यामुळे आधी मदत पूरग्रस्तांना आणि नंतर लग्न पुतण्याचे .. याप्रमाणे शिवसेनेने मदत केलीय..
*Yuwaraj wagh buldana*