पळसखेड जयंती रस्ताची दुरदर्शा. ग्रामस्थांसह स्वाभिमानी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात..
चिखली–
शहरापासुन जवळ असलेल्या पळसखेड जयंती फाटा ते गावापर्यतच्या रस्त्यांची शासकीय गोडाउन वर येणारा जड वाहतुकीमुळे दुरावस्था झाल्याने “स्वाभिमानी”चे विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी आंदोलन केले होते.दरम्याण या रस्ता डांबरीकरणासाठी निधी मंजुर करण्यात आला आहे.स्वाभिमानी संघटनेच्या लढ्यास यश आले आहे.परंतु प्रत्यक्ष मात्र कामास सुरुवात झाली नसल्याने या कामास तातडीने सुरुवात करण्यात येवुन पुर्वीप्रमाणे उपाययोजना कराव्यात,वाढिव निधीचा प्रस्ताव वरीष्ठांना पाठवण्यात यावा,अशी मागणी ग्रामस्थांसह स्वाभिमानीने केली आहे.पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा स्मरणपत्राव्दारे दि३०जुलै रोजी देण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील रस्ते हे विकासाच्या धमण्या मानले जातात.चांगले रस्ते असणे हि काळाची गरज आहे.परंतु गावालगत शासकीय गोडाउन आणि त्यावर होत असलेल्या जड वाहतुकीमुळे पळसखेड जयंती फाटा ते गावापर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती.रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडुन रस्त्यावर माती मुळे चिखल झाला होता.तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक,नितिन राजपुत यांनी ग्रामस्थांसह जिल्हा परीषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन देखील केले होते.दरम्याण त्यावेळी आंदोलनाची दखल घेऊन तात्पुर्ता स्वरुपात रस्ता दुरुस्ती काम स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या मध्यस्ती नंतर करण्यात आले होते.रस्ता डांबरीकरणाचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठवण्यात आला होता.या प्रस्तावास मान्यता मिळाली आहे.तर डांबरीकरणासाठी १८लाखाची मंजुरात देण्यात आली आहे.परंतु महिणे उलटुन सुद्धा सदर रस्ता कामास सुरुवात झाली नसल्याने व सततच्या पावसामुळे रस्त्याची पुर्वीप्रमाणे जै से थे अवस्था झाली असल्याने ग्रामस्थांना चिखल तुडवित जावे लागत आहे व किरकोळ आपघात प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे.या रस्त्यावरुण शासकीय गोडावुनवर जड वाहतुक होत असल्यामुळे या रस्त्याचे मंजुर डांबरीकरण काम तातडीने करण्यात यावे,पुर्वी प्रमाणे तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना करण्यात याव्यात,या संपुर्णच रस्त्याची दुरावस्था झालेली असल्याने याबाबतचा प्रस्ताव वरीष्ठांना पाठवुन वाढिव निधीची तरतुद करण्यात यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ग्रामस्थांकडुन जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता,तहसिलदार,यांच्याकडे करण्यात आली आहे.मागण्यांची पुर्तता ७ दिवसांमध्ये न झाल्यास शासकीय गोडाउनवर येणारी जड वाहतुकीस बंदी करण्यात येईल किवा तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्मरणपत्राद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी स्वाभिमानीचे विनायक सरनाईक,नितिन राजपुत,परमेश्वर लोखंडे,रविंद्र लोखंडे,कृष्णा शिंदे,एकनाथ लोखंडे,नामदेव लोखंडे,संतोष खरात,समाधान लोखंडे,गणेश लोखंडे,संतोष भुसारी,प्रदिप लोखंडे,शिवाजी लोखंडे यांच्यासह आदि उपस्थीत होते
.
रविकांत तुपकरांची मुंबई वारी यशस्वी..
पळसखेड जयंती रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडुन होत असल्याने तुपकरांनी थेट मुंबई गाठुन ग्रामविकास विभागाकडे पडुन असलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची मागणी लावुन धरली होती.तर या रस्ता डांबरीकरणास निधी मिळाला असल्याने तुपकरांची मुंबई वारी यशस्वी झाली आहे.