*बुलढाणा जिल्ह्यातील आणखी एका जवानाला वीरमरण*
अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये कर्तव्य बजावत असताना बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथील जवान जवान किशोर काळूसे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने 4 ऑगस्टच्या दुपारी दोन वाजता वीरमरण आले दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्यांना . मृत्युसमयी त्यांचे वय 32 वर्ष होते. जवान किशोर काळूसे हे वयाच्या 19 व्या वर्षी 2009 मध्ये सैन्यात भरती झाले होते. त्यांनी सिलिगुडी व पंजाब मधील जालंदर येथे देश सेवा केली त्यानंतर 2019 मध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर येथील मिलिट्री कॅम्प मध्ये त्यांची बदली झाली. दिनांक 4 ऑगस्ट रोजी आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जवान किशोर काळुसे हे नायब सुभेदार पदावर होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, एक भाऊ व एक बहीण असा आप्तपरिवार आहे. जवान किशोर काळुसे यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर, मित्र परिवारावर तसेच संपूर्ण बीबी गावावर शोककळा पसरली आहे आज पाच ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्यावर मूळ गाव असलेल्या बिबी येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे…
*Yuvraj wagh buldana*