*सरकारी तलाव परिसरातील 60 ते 70 वर्षे असतेल्या पंचवीस ते तीस झाडांची करण्यात आली कत्तल*
बुलढाणा कृषी कार्यालय आणि सरकारी तलाव परिसरात असलेल्या 20 ते 25 जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे हि झाडे का तोडली यासंदर्भात कृषी अधिकार्यांशी विचारणा केली असता ही झाडे तोडण्यास नाही ..छाटणी करण्याचे ठेकेदाराला सांगण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिले आहे त्यामुळे विनाकारण झाडाची कत्तल करणाऱ्या ठेकेदारांवर कृषी विभाग गुन्हा दाखल का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे एकीकडे शासन झाडे जगवा झाडे लावा या साठी प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे मात्र शासनाचा बुलढाण्यातील कृषी विभाग झाडे तोडण्याच्या मार्गावर लागला असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे
बुलढाणा शहरातील धाड रोड लगत बुलढाणा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आहे त्या कार्यालय बाजूलाच सरकारी तलाव आहे या सरकारी तलाव परिसर वॉकिंग ट्रॅक तयार करण्यात आला असून दररोज सकाळ-संध्याकाळ याठिकाणी अनेक नागरीक वॉकिंगसाठी येतात या परिसरात मध्ये मोठ्या प्रमाणात झाडे असल्यामुळे शुद्ध ऑक्सिजन वाकिंग करणाऱ्या नागरिकांना मिळते परंतु ही झाडेच नष्ट होत असल्याचा प्रकार निसर्गप्रेमींच्या लक्षात आल्यानंतर यासंदर्भात ची माहिती कृषी विभागाला विचारण्यात आली असता छाटणी ऐवजी वृक्ष तोडणीच गोड बंगाल बाहेर आलोय
*कृषी विभागाने दिले झाडे छटाईचे आदेश… ठेकेदाराने मुळासगट तोडली झाडे*
कृषी विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी या परिसरातील झाडांची छाटणी व विषारी युक्त वनस्पतींची तोडणी करण्याचे आदेश एका ठेकेदाराला दिले आहेत परंतु या ठेकेदाराने 60 ते 70 वर्षे जुनी असलेली व बाबुळ जांभूळ इंग्रजी चिंचा अशा नाना झाडे तोडून नेण्याचा सपाटाच लावलाय जवळपास पंचवीस ते तीस झाडांची कत्तल या ठेकेदाराने केली आहे
*केवळ दहा हजार रुपयांना दिले झाडे छटई व तोडण्याचे आदेश*… **ठेकेदारासोबत अधिकाऱ्याची आर्थिक तडजोडची शक्यता”*
- बुलढाणा उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी सरकारी तलाव परिसरात असलेली निरोपयोगी झाडांची छाटणी करावी व विषारी वेलींची तोडणी करण्याचे आदेश एका ठेकेदाराला दिले आदेशातील विषय हा झाडे छटाई करण्याचा आहे परंतु कोणती झाडे तोडावी याची मार्किंग देण्याचं सौजन्य कृषी विभागाने दाखवले नाही झाडांची छपाई करताना कोणताही कृषी अधिकारी किंवा कर्मचारी त्या ठिकाणी ठेकेदारास सोबत उपस्थित नव्हता तर ठेकेदार राजरोसपणे या परिसरातील झाडांची कत्तल करत होता एक प्रकारे संबंधित ठेकेदाराला आपणास निरुपयोगी वाढलेली झाडे तोडावी अशी मुभा कृषी अधिकाऱ्यांनी देऊन टाकली अधिकाराचा वरदहस्त असलेल्या या ठेकेदाराने निरुपयोगी असलेली चिंच बाभूळ जांभूळ या झाडांची कत्तल केली आदेश छाटणीचे असताना झाडांची कत्तल करण्याचा मनसुबा ठेकेदाराने केल्याने यामध्ये आर्थिक हित जोपासल्या गेल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सरकारी तलाव परिसरात तोडण्यात आलेल्या झाड प्रकरणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पर्यावरण मित्रांनी केली आहे