- कर्मयोगी शिवशंकरभाऊ यांना पद्मविभूषण पुरस्कार घोषित करावा : राष्ट्रवादी काँग्रेस करणार मागणी
शेगाव प्रतिनिधी ✒️
कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांचे अध्यात्मिक क्षेत्रात व सेवा कार्यात असलेले कार्य बघता त्यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी शेगाव येथे पत्रकार परिषदेत केली. ते म्हणालेकी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्फत पंतप्रधानांकडे हि मागणी रेटून धरल्या जाईल असेही ते म्हणाले.
: ॲड.नाझेर काझी यांनी आज रविवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या स्मृती स्थळावर जाऊन दर्शन घेतले आणि श्री संत गजानन महाराज संस्थानचे कार्यकारी विश्वस्त तसेच भाऊंचे ज्येष्ठ सुपुत्र निळकंठ दादा पाटील, श्रीकांत दादा पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यांनतर विश्रम भवनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ॲड. नाझेर काझी यांनी सांगितले की शिवशंकर भाऊ यांचे कार्य केवळ सेवा पुरते मर्यादित नव्हते तर त्यांनी संपूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच्या सेवा कार्याचा संदेश पोहोचविला त्यांच्या कर्तृत्वाची दखल परराष्ट्र मध्ये सुद्धा घेण्यात आलेली आहे. अश्या श्रेष्ठ कार्य केलेल्या कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांना भारत सरकारने सर्वाधिक प्रतिष्ठेचा असलेला पद्मविभूषण पुरस्कार घोषित करून त्यांच्या कार्याचा गौरव करावा अशी मागणी याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपण करीत असून पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मार्फत पंतप्रधानांकडे हि मागणी रेटून धरल्या जाईल असेही ते म्हणाले.
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]