हुतात्मा स्मांरकांजवळ आढळली अस्वच्छता आणि दारूच्या बाटल्या…. क्रांतिदिनी केले काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन….
शेगाव प्रतिनिधी
शेगावात आज काँग्रेस पक्ष आंदोलनाच्या मूड मध्ये असलयाचे दिसून आले. क्रांतिदिनानिमिताने स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाजवळ अभिवादन करण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना हुतात्मा स्मारकाजवळ अस्वच्छता आणि दारूच्या बाटल्या आढळली. यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी या स्तंभ आणि स्मारकाजवळील घाण कचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या घेऊन थेट नगरपालिकेत पोहचले. आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. यामुळे पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली.
: बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात आज ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमिताने दरवर्षीप्रमाणे काँग्रेस पक्षाच्या वतीने स्थानिक महात्मा गांधी चौकातील जयस्तंभ जवळ क्रांतिदिनी स्वातंत्र्य सेनानी यांच्या सन्मानार्थ सकाळी नऊ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अभिवादनासाठी जेंव्हा जयस्तंभ जवळ पोहचले तेंव्हा तेथे सर्वत्र घाण कचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या. यामुळे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. याबाबत त्यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता मुख्याधिकार्यांनी त्यांना बेजबाबदारपणे उत्तर देत सफाई कामगारच नव्हे तर संपूर्ण नगरपालिका आंदोलनावर आहे. त्यामुळे मी सुद्धा आंदोलनावर आहे. अशी खोटी माहिती फोन वरून दिली.
मुख्याधिकाऱ्यांच्या या बेजवाबदारपनाच्या वक्तव्यामुळे काँग्रेस मंडळींचा राग अनावर झाला आणि संतप्त पदाधिकाऱ्यांनी जयस्तंभ आणि स्मारकाजवळील घाण कचरा आणि दारूच्या रिकाम्या बाटल्या घेऊन थेट नांगर पालिकेत पोहचले. आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. यामुळे पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. दोन तास चाललेल्या या आंदोलनात प्रशासकीय अधिकारी ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आणि घाण कचरा भेट देण्यात आला.