अखेर टॉवरमॅनला पोलिसांनी सुखरूप खाली उतरले.…
बुलढाणा (प्रतिनिधी)
बुलढाणा शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या बी एस एन च्या उँच टॉवर वर बुलढाणा शहरातील मिलिंद नगर भागात राहणारा संजय जाधव हा इसम चढला होता सायंकाळी साडेचार वाजता हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आला उंचावर असलेल्या टॉवरच्या वायरला पकडून तो वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करत होता तर जिल्हाधिकारी कार्यालय लगतच्या रोडवर त्याला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती त्याला खाली उतरण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने प्रयत्न सुरू करण्यात आले होते त्याची ओळख पटविण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोन कॅमेरा द्वारे त्याचे छायाचित्र काढण्यात आले त्यानंतर त्याला खाली करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले अखेर रात्री साडेनऊ वाजता र्टॉवरमॅन संजय जाधव ला सुखरूप खाली उतरवण्यात आले त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो का बरं टॉवर वर चढला याबद्दल माहिती जाणून घेतल्या जात आहे यापूर्वीही या टॉवरवर एक व्यक्ती चढला होता आपल्या पत्नीला मनवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे बाब त्यावेळी उघडकीस आली होती तर संजय जाधव हे काबर या टॉवरवर चढले याबाबतचा खुलासा अद्याप पर्यंत झालेला नव्हता पोलीस या संदर्भात चौकशी करत आहे …