कुणबी युवा मंचचे आमरण उपोषण*
खामगाव : कुणबी समाजाच्या विविध मागण्यांसाठी क्रांतीदिनाचे औचित्य साधून संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरूवात करण्यात आली आहे. लोकसंख्येने सर्वाधिक असलेल्या कुणबी समाज विविध समस्येतून जात आहे. कुणबी समाजाच्या समस्या तात्काळ सोडविणे गजरेचे असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचने पुढाकार घेतला आहे. देहू संस्थानच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा जाहीर करून किमान ५०० कोटींचा निधी देण्यात यावा, पुणे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळास संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, मराठवाड्यातील वाइदेशी, अक्करमासी कुणबी समाजाला ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, कोकणातील कुणबी समाजासाठी अस्तित्वात असलेल्या शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळला किमान ३००० कोटीचा निधी देण्यात यावा व या महामंडळाची व्याप्ती महाराष्ट्रभर करण्यात यावी, ओबीसी समाजातील मुला – मुलींसाठी जिल्हास्तरावर वस्तीगृह देण्यात यावे, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, संत तुकाराम महाराजांच्या जन्म तारखे संदर्भात संशोधन करून शासन स्तरावर नोंद करण्यात यावी यासह कुणबी समाजाच्या विविध मागण्यांसाठी संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंचच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. : दरम्यान खामगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आपल्या कारकर्त्यांसह उपोषण मंडपात भेट देऊन मागण्यांचे समर्थन करणारे पत्र उपोषणकर्त्यांना देऊन शासनस्तरावर मागण्या मेनी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रातनमूद करण्यात आले आहे.