ज्ञानगंगा अभयारण्यात मेंढपाळ आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये चकमक…हवेत गोळीबार …

0
447

ज्ञानगंगा अभयारण्यात मेंढपाळ आणि वन कर्मचाऱ्यांमध्ये चकमक…हवेत गोळीबार …

बुलडाणा (प्रतिनिधी )
ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये अवैधरित्या मेंढी चराई करण्यासाठी गेलेल्या मेंढपाळांनी वन कर्मचाऱ्यांवर लाठयांकाठीनी हल्ला केला तर वन्य कर्मचाऱ्यांनी हवेत गोळीबार केल्याची घटना नुकतीच घडली असून या घटनेमध्ये कुठलीही जीवीत हानी झाली नाही, तर मेंढपाळ घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे..

ज्ञानगंगा अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव नाथ परिसरामधील सुई टेकडी परिसरात काही मेंढपाळ त्यांच्या बकऱ्या सह अवैध प्रवेश करून चराईत करित असल्याची माहिती खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी लोखंडे यांना मिळाली त्या आधारे पिंपळगाव नाथ मधील सुई टेकडी येथे पथक कार्यवाही करण्यासाठी पाठविण्यात आले असता, काही मेंढपाळांनी कर्मचार्‍यांवर काठीने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला,ही बाब लक्षात येताच वनपरिक्षेत्र अधिकारी लोखंडे यांनी त्यांच्या जवळ असलेल्या 9mm पिस्टल ने प्रथम हवेत गोळीबार केला त्यावेळी 35 ते 40 मेंढपाळांनी लाठ्याकाट्या सह लोखंडे यांच्यावर ही जीवघेना हल्ला करण्याच्या उद्देशाने येताना दिसल्याने पुनश्च वनपरिक्षेत्र अधिकारी लोखंडे यांनी दोन वेळा हवेत गोळीबार केला, त्यामुळे अज्ञात 35 ते 40 मेंढपाळांनी मेंढी-बकऱ्या सह तेथून पळ काढून जंगलात फरार होण्यात यशस्वी झाले आहेत, दरम्यान अज्ञात 35 ते 40 मेंढपाळांवर भारतीय वन अधिनियम नुसार विविध कलमे गुन्हे दाखल करण्यात आले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here