रानभाज्या आरोग्यासाठी महत्त्वाच्य
बुलडाणा प्रतिनिधी
बुलढाणा तालुका कृषी अधिकारी व कृषि विज्ञान केंद्र, बुलढाणा यांच्या वतीने तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव आयोजन आज 12 ऑगष्ट रोजी करण्यात आले होते .या महोत्सवाचे उद्घाटन बुलढाणा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते झाले . या वेळी पंचायत समिती सभापती सौ उषाताई चाटे, पंचायत समिती सदस्य सौ कविताताई लहासे, श्री नरेंद्र नाईक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, बुलडाणा, डॉ. चंद्रकांत जायभाये वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषी संशोधन केंद्र, बुलढाणा, श्री संतोष डाबरे उपविभागीय कृषी अधिकारी, बुलडाणा, श्री दिनकर मेरत, तालुका कृषी अधिकारी, बुलढाणा, श्री गजानन इंगळे, बी.टी.एम आत्मा, बुलढाणा व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच कृषी विज्ञान केंद्र मधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
महोत्सवाच्या माध्यमातून रानभाज्याचे महत्व प्रसारित करणे, विपणन साखळी निर्माण करणे व नागरिका पर्यंत रानभाज्यांचे औषधी व मानवी जीवनातील त्याचे महत्त्व पटवून देणे याबाबतची माहिती सदर महोत्सवात देण्यात आली. याप्रसंगी आत्मा अंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी गटामार्फत विविध प्रकारच्या रानभाज्या चे प्रकार व त्याचे मानवी आहारातील महत्त्व विषद करून माहिती देण्यात आली. सदर प्रसंगी बुलढाणा शहरातील नागरिकांनी रानभाज्या खरेदी करून उस्फुर्त प्रतिसाद दिला.