जिजामाता सहकारी साखर कारखान्याची मंत्रीद्वयांनी केली पाहणी

0
275

विदर्भातील पहिला जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी सर्वोत्तरी प्रयत्न करणार – ना डॉ शिंगणेसाहेब ; आरोग्य मंत्री राजेश टोपे व पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्याकडून कारखान्याची पहाणी

विदर्भातील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणजे सिंदखेड राजा तालुक्यातील जिजामाता सहकारी साखर कारखाना १९७२ मध्ये उभारण्यात आला होता. परंतु अनेक तांत्रिक अडचणीमुळे अनेक वर्षापासून सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत आहे. पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिजामाता साखर कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असून आरोग्यमंत्री राजेश टोपे व त्यांच्यासोबत असलेल्या वर्क मॅनेजर यांनी कारखान्याची प्राथमिक पाहणी करून माहिती घेतली आहे.यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की,
मागील २० वर्षात मध्ये जिजामाता सहकारी साखर कारखाना २ वर्षे सुरू होता, २ वर्षात सुद्धा दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कारखाना कमी प्रमाणात सुरु राहिला साखर उद्योगांमध्ये अनेक अडचणी असतात. साखर उद्योगावर अवलंबून न राहता त्याचबरोबर इथेनॉल , वीज यासह सहवीज प्रकल्प सुरू ठेवावे लागतात. तेव्हा साखर कारखाना सुरळीत चालू शकतो. सोबत असलेल्या मॅनेजर यांनी गोडाऊन व मशनरीची पाहणी केली कारखान्यांमध्ये अनेक ठिकाणी फूट आहे तरीसुद्धा त्यामध्ये व्यवहारिकता कशी राहील हेच पहावे लागणार आहे.
खडकपूर्णाचा प्रकल्प असल्यामुळे व परीसरात सिंचनाची चांगल्या प्रकारे व्यवस्था असल्यामुळे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी जिजामाता सहकारी साखर कारखाना सुरू होण्यासाठी अनेक वेळा चर्चा केली, कारखाना सुरू करण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यासाठी आम्ही जिजामाता सहकारी साखर कारखान्याचे प्राथमिक पाहणी करण्यासाठी आलो आहे.१९७२ च्या काळात अण्णासाहेब देशमुख यांनी सुरू केलेला साखर कारखाना मध्ये असलेली डिझाईन कन्ट्रक्शन खूप चांगल्या प्रकारे आहेत. कारखान्यांमध्ये सध्या लाईट नसताना सुद्धा कारखान्यात प्रकाश आहे. साखर कारखाना सुरू झाला तर परिसरामध्ये लक्ष्मी नांदू शकते कारखाना करण्यासाठी खूप मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे त्यासाठीच प्राथमिक पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की जिजामाता सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी वरदान आहे व जिजामाता कारखाना सुरू होण्यसाठी प्रयत्न सुरू आहे महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून मतदारसंघातील बंद असलेले प्रकल्प सुरू होण्यासाठी पाठपुरावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून जिजामाता सहकारी साखर कारखाना ची पाहणी करण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे व त्यांचे सहकारी आले आहे. जिजामाता कारखाना भाडेतत्त्वावर किंवा विक्री घेऊन ताब्यात घेतल्यास परिसरातील ऊस उत्पादक व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळणार आहे सकारात्मक दृष्टीचा विचार करण्याची विनंती डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, टेक्निकल मॅनेजर सुरवसे, प्रदेश सरचिटणीस इरफान अली, माजी सभापती विलासराव देशमुख,सरपंच प्रकाश सांगळे,गजानन देशमुख, रामा राठोड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here