बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर अपघात 13 ठार.

0
857
  • बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर अपघात13ठार  ...*

– बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामावरील लोखंड घेऊन जाणारा ट्रक पलटी होऊन तेरा जण मृत्यूमुखी पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली….

बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे काम चालू आहे जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव फाट्याजवळ एका परिवहन महामंडळाच्या बसला साईड देताना समृद्धी महामार्गाच्या कामावरील टिप्पर रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात 13 मजूर ठार झालेत ,जखमीपैकी 2 मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. जखमी मजुरांवर किनगाव राजा , सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलंय , समृद्धी महामार्गाच्या कामावरील हे टिप्पर लोखंडी रॉड घेऊन समृध्दी महामार्गाच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला , अपघात इतका भीषण होता की टिप्पर पलटी झाल्यावर लोखंडी रॉड खाली 16 मजूर दाबल्या गेलेत. तात्काळ स्थानिक नागरिकांनी मदत कार्य सुरू केल्याने जखमींना बाहेर काढण्यात आलं.

 

*Yuvaraj wagh bulana*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here