*स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नेहरू युवा केंद्राच्यावतीने घेण्यात आली फिट इंडिया रन स्पर्धा*
स्वातंत्र्याच्याअमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बुलडाणा येथे फिट इंडिया रनचे आयोजन करण्यात आलं होतं
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होत आहे या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे बुलडाणा येथे नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने 28 ऑगस्ट रोजी फिट इंडिया रण आयोजन करण्यात आलं होतं बुलढाणा येथील हुतात्मा स्मारक येथे शहिदांना अभिवादन करण्यात आलं बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी
हुतात्मा स्मारकाला पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली त्यानंतर उपस्थित खेळाडूंना प्रतिज्ञा देण्यात आली .या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव नेहरू युवा केंद्राचे नरेंद्र डागर यावेळी उपस्थित होते
. हुतात्मा स्मारक येथून सकाळी साडेसात वाजता फिट इंडिया रन स्पर्धेला आमदार संजय गायकवाड यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले त्यांनंतर शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत या रॅलीचा समारोप पुन्हा हुतात्मा स्मारक येथे झाला रॅलीमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणा दिल्या समारोपीय कार्यक्रमात खेळाडूंना मार्गदर्शन करताना आमदार संजय गायकवाड म्हणाले की तरुणाना शिवाय कुठेही क्रांती होऊ शकत नाही आजचे तरुण उद्याच्या भारताचे भविष्य आहे दररोज व्यायाम करून या तरूणांनी निरोगी सुदृढ राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .फिट इंडिया रन स्पर्धेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात 75 ठिकाणी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत याची सुरुवात आजपासून बुलढाणा येथून झाली अशी माहिती नेहरू युवा केंद्राचे अधिकारी नरेंद्र डागर यांनी दिली
फिट इंडिया रन स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते