*राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरुष स्पर्धेचे बुलढाणा येथे झाला उद्घाटन*
*बुलडाणा*– ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कामगिरीमुळे राज्य आणि देशाचे नाव लौकिक होत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलाय
बुलढाणा येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने 90 व्या राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरूष स्पर्धेचे आयोजन करण्यात आल आहे 3 सप्टेंबरला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते उद्घाटन झाल त्यावेळी ते बोलत होते ते पुढे म्हणाले की खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या या दृष्टिकोनातून खेळाडूंना नोकरीमध्ये आरक्षण देण्याचे काम आपण क्रीडामंत्री असताना केलं ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा आपल्या खेळांच्या माध्यमातून देशाचं नाव उंचावत आहे ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे खेळाडूंनी देशाचा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करण्यासाठी चांगलं प्रदर्शन करावं असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं खेळाडूंनी सांघिक भावना जोपासूनच आपल्या खेळाचं प्रदर्शन करावं अस आवाहन त्यांनी यावेळी केल बुलडाणा येथे आयोजित बॉक्सिंग स्पर्धेमध्ये राज्यभरातून 271 खेळाडूंची नोंदणी झाली आहे या स्पर्धे मधूनच महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे बुलढाणा येथे झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सीग स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड जिल्हाधिकारी एस रामामुर्ती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते