*राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरुष अजिंक्य स्पर्धेत 271 सदस्यांची नोंदणी….*
बुलढाणा ( प्रतिनिधी)
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन आणि बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या वतीने बुलढाणा येथे राज्यस्तरीय बॉक्सिंग पुरुष अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे 3 सप्टेंबरला बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन झालं या कार्यक्रमाला बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड व जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते
या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 271 बॉक्सिंग खेळाडूंनी आपली नोंदणी केली आहे जिल्हा क्रीडा संकुल परिसरामध्ये या स्पर्धा सध्या सुरू आहेत विविध जिल्ह्यातील बॉक्सिंग पटू या ठिकाणी दाखल झाले आहेत या खेळाडू मधून महाराष्ट्राच्या जिल्हा बॉक्सिंग संघाची निवड केल्या जाणार आहेत बुलढाणा सारख्या मागासलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खेळायला प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील क्रिडा असोसिएशनच्या सदस्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे यामध्ये महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे महासचिव कुमार वावळ कोषाध्यक्ष एकनाथराव चव्हाण बुलडाणा बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडेकर राकेश तिवारी बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रा संतोष आंबेकर सचिव राजसिंग सोळंकी प्रा गणेश बोचरे यांचा पुढाकार ही महत्वाचा आहे कारण कोणतेही स्पर्धा घेण्यासाठी त्याचं नियोजन आयोजन करण्याची जबाबदारी ही महत्त्वाची असते आणि ही जबाबदारी स्वीकारून बुलढाणा मध्ये सध्या बॉक्सिंगच्या राज्यस्तरीय स्पर्धा सुरू आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून बॉक्सिंग खेळाडूंना प्रेरणा मिळून भविष्यात बुलढाण्यात बॉक्सिंग पटु तयार होण्यास मदत होणार आहे एवढं मात्र निश्चित