*मॉर्निंग वाकसाठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास ट्रकने चिरडले…..*
बुलडाणा प्रतिनिधी
आज सोमवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या महिला पोलीस कर्मचारी गीता सुभाष बामंदे तायडे वय वर्ष 45 राहणार पोलीस वसाहत मॉर्निंग वॉक साठी चिखली रोडणे जात असताना MECB ऑफिस समोर ट्रक ने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हिमाचल प्रदेश येथून सफरचंद भरलेला ट्रक नांदेड कडे जात असताना चिखली रोड वरील MSCB ऑफिस समोर ट्रक चालकाच्या हलगर्जीपणामुळे महिला पोलीस कर्मचारी मृतक गीता सुभाष बामंदे तायडे यांना जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याची माहिती पोलीस विभागाला मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन यातील ट्रक क्रमांक PB 03BB8139 व ट्रकचालक बाबुसिंग प्रेमसिंग अहिरे वय वर्ष 32 राहणार माणसा पंजाब व त्याचा साथीदार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत. महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने शहर पोलीस कर्मचारी वसाहत पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी करिता जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आला आहे.