बुलढाणा जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस;* *शेगाव तालुक्यातील आदित्य गवई हा युवक वाहून गेला*
*An : रात्रीपासून पासून बुलढाणा जिल्ह्याला पावसाने झोडपून काढल्यानंतर आजही दिवसभर पावसाची संततधार सुरुच होती जिल्ह्यातील बहुतांश भागात काल रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. शेगाव तालुक्यातील जवळा बु. या गावातील एक १७ वर्षीय युवक नदीच्या प्रवाहात वाहून गेला तर खामगाव, शेगाव नांदुरा आणि मलकापूर शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने रात्री पासून तारांबळ उडाली असून जनजीवन प्रभावी झाले आहे रात्रीपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहे अनेक नद्यांना पूर आल्यामुळे वाळू वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे