*ठाणेदार आडोळे यांचा स्तुत्य उपक्रम….गावाच्या गस्तीसाठी स्वखर्चातून दिले दोन सुरक्षारक्षक …*
सिंदखेड राजा
तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडून एकतीस बॉक्स चोरून नेले त्यामुळे पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे त्याचाच एक भाग म्हणून यापुढे गावात चोऱ्या होऊ नयेत यासाठी साखरखेर्डा पोलीस स्टेशन ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी चोरटे जेरबंद करण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली आहे तथापी चोऱ्या होऊ नये यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना व्हायला पाहिजेत याकरिता ठाणेदार आडोळे यांनी व्यापारी वर्गाची बैठक बोलावून त्यांच्याशी चर्चा केली आणि गावात रात्रीची गस्त घालण्यासाठी पुरेसा पोलीस स्टाफ नसल्याने पोलीस नेमता येणे शक्य नसल्याचे ठाणेदारांनी आपल्या स्वखर्चाने गावाच्या गस्तीसाठी दोन सुरक्षारक्षक तैनात केले आहेत त्यांच्या दिलदार पणाचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तर व्यापारी मंडळांनी देखील सदर सुरक्षारक्षकान दर आठवड्याला प्रत्येक दुकानदार पैसे देईल असे सांगितले ठाणेदारामुळे गावात रात्रीची गस्त घालण्यासाठी सुरक्षारक्षक मिळाल्याने गावकर्यांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला आहे
याबाबत माहिती अशी की मलकापूर पांग्रा येथे दीड महिन्याच्या आतच एकच देशी दारूचे दुकान दुसऱ्यांदा चोरट्यांनी फोडले त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशद पसरली घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला करण्यात आली त्यानुसार ठाणेदार आडोळे यानी तपास सुरू केला आणि पोलीस मदत केंद्र समोर व्यापाऱ्यांची बैठक बोलावली यावेळी काय काय उपाययोजना करण्यात येईल याबाबत सखोल चर्चा करण्यात आली गावात सीसीटीवी लावा सीसीटीव्हीचे कवरेज रोडवर होईल असे कॅमेरे बसवा रात्रीची गस्त वाढवा कायमस्वरूपी पोलिस द्या रात्री विद्युत पुरवठा बंद असतो तो सुरळीत करावा असे अनेक उपाय या बैठकीत करण्यात आले या बैठकीत मध्ये ठाणेदार न सांगितले की रात्रीच्या गस्तीसाठी कर्मचारी कमी असल्याने कायमस्वरूपी पोलीस मिळणे शक्य नाही मात्र आपण पोलीस मदत केंद्र ऐवजी पोलीस चौकी करावी अशी मागणी आपण आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे करणार आहोत या ठिकाणी होमगार्ड जर दिले तरी कायमस्वरूपी येथे राहू शकत नाही त्यामुळे या गावचा प्रश्न सुटणार नाही पोलिस यंत्रणा आहे तेवढी कमीच आहे यासाठी गावातूनच तरुणांनी रात्रीची गस्त द्यावी असे आवाहन केले मात्र त्याला सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ठाणेदार आडोळे यांनी गावातील दोघांना सुरक्षारक्षक म्हणून नेमले आणि त्यांचा पगार दर आठवड्याला मी स्वतः देतो असे सांगून त्यांनी मिटिंग मध्ये 2 हजार रुपये दिले आणि प्रत्येक आठवड्याला मी पैसे देईल असे सांगितले त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे उपस्थितांनी ठाणेदाराचे कौतुक केले दरम्यान उपस्थित व्यापाऱ्यांनीही आपण देखील त्या सुरक्षरक्षकांना प्रत्येक दुकानदार दर आठवड्याला ठराविक रक्कम देईल असे सांगितले त्यामुळे गावच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला असून गावात रात्रीची गस्त सुरू झाली आहे यासाठी ठाणेदार यांनी सदर सुरक्षा रक्षकांना दंडे आणि शिट्ट्या दिल्या आहेत व्यापारी यांचा व्हाट्सअप ग्रुप करून त्यांना रात्री गस्तीचे फोटो देखील दररोज पाठवले जाणार आहेत दरम्यान ग्रामपंचायत च्या वतीने लोक सहभागातून गावात सीसीटीव्ही लावु असे सरपंच भगवान उगले यांनी सांगितले या बैठकीला सरपंच भगवान उगले तंटामुक्ती अध्यक्ष मोहम्मद सारखा पोलीस उपनिरीक्षक अत्तर शेख बिट जमादार नारायण गीते सराफा असोसिएशनचे वसंतराव उदावंत पोलीस पाटील पत्रकार आणि व्यापारी या बैठकीला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते