बाप्पा निरोपासाठी न पा ची तयारी …सरकारी तलाव परिसरात साफसफाईचे तिन तेरा …रस्त्यालगत गाजर गवत वनस्पती आणि पाण्याच्या डबक्याचे सुशोभिकरण …
बुलडाणा ( प्रतिनिधी )
बाप्पास ला निरोप देण्यासाठी केवळ काही तासाचा अवधी शिल्लक राहिला असून बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी बुलढाणा येथील सरकारी तलाव परिसरामध्ये नगरपालिका प्रशासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु सरकारी तलावाच्या परिसरामध्ये साफसफाईचे तीन-तेरा वाजले असून या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवत,तरोडा रस्त्यालगत उभ्या असुन काही ठिकाणी पाण्याचे डबके साचलेले असल्यामुळे बाप्पांच्या भक्तांना यातूनच मार्गस्थ व्हावे लागणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे .याकडे नगरपालिका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे…..
बुलढाणा शहरातील नागरिक बाप्पांचे विसर्जन सरकारी तलावांमध्ये दरवर्षी करत असतात बाप्पांच्या भक्तांना विसर्जन करतेवेळी कोणतीही अडचण येऊ नये दृष्टिकोनातून नगरपालिका प्रशासनाने गेल्या चार दिवसापासून काम सुरू केले आहे… बुलडाणा नगरपालिका प्रशासनाने ठिकठिकानी टेबल लावून चार ही बाजूंनी विद्युत ची व्यवस्था केली आहे जेणेकरून रात्रीच्या वेळी बाप्पांच्या भक्तांना कोणतीही इजा होऊ नये ही बाब कौतुकास्पद असली तरी मात्र रस्त्याच्या आजूबाजूला आजही मोठ्या प्रमाणात तरोडा व इतर वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्या तोडून त्या नायनाट करणे गरजेचे आहे कारण त्यामधून सरपटणारे प्राणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही ….
साफसफाईचे तीन-तेरा*
सरकारी तलावांमध्ये बाप्पा विसर्जन करण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग हा धाड रोड वरून सरकारी तलावाच्या मेन गेट वरून बाप्पाच्या भक्तांना येता येणार आहे तर दुसरा मार्ग हा जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाला लागुन असलेल्या छोट्या गेटमधून भक्तांना येता येणार आहे या रस्त्याच्या बाजूला विद्युत खांब लावून रोषणाई करण्यात आलेली आहे परंतु रस्त्यालगत मोठ्याप्रमाणात तरोडा गाजर गवत वाढलेले आहेत तर या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाण्याचे डबके ही बसलेले आहेत या पाण्याच्या डबक्यामध्ये मुरूम टाकून त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे…
*डझनभर कर्मचारी आणि कवली भर साफसफाई*
एक लाख बुलढाणेकर बाप्पांना अखेरचा निरोप देण्यासाठी सरकारी तलावातील परिसरामध्ये येणार आहेत… या परिसराची साफसफाई करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून काम करत आहेत परंतु डझनभर कर्मचारी आणि केवळ कवळी भर साफसफाई असाच प्रकार या ठिकाणी निदर्शनास आला आहे… गेल्या तीन दिवसांपासून राब राब राबणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी गेटच्या मुख्यभागातील साफसफाई चोखपणे केली असुन केलेल्या कामाची पावती म्हणुन केलेल्या कामाच्या साफसफाई कचऱ्यांचा ठिग मारुन ठेवला आहे…याठिगाऱ्यावरुन डझनभर कर्मचारी कवळीभर साफसफाई असचं म्हणावं लागेल ….
दरवर्षी बुलढाणा शहरातील घरोघरी व सार्वजनिक गणरायाचं विसर्जन हे सरकारी तलावात होत असतं या परिसरामध्ये नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करून बापाच्या भक्तांना कुठेही त्रास होणार नाही याची काळजी न पा प्रशासनाच्या वतीने घेण्यात येते परंतु या वर्षी मात्र नगरपालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याची बाब निदर्शनास येत आहे गेल्यावर्षी मुख्याधिकार्यांनी स्वतः जाऊन या घटनास्थळाची पाहणी केली होती.. यावर्षी नगरपालिकेमध्ये नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी घटनास्थळी जाऊन घटनास्थळाची पाहणी केल्यास या सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास येतील तेव्हा मुख्याधिकार्यांनी वेळ काढून या परिसराला भेट देणे गरजेचे आहे …..