खामगांवहुन 600 कट्टे रेशनधान्य काळ्याबाजारात जात असतांना पोलिसांनी पकडला, चालकावर गुन्हा दाखल,मुख्य रेशन माफिया मोकाटच,पुरवठा विभागाचा झोपेचा सोंग*

0
109

*खामगांवहुन 600 कट्टे रेशनधान्य काळ्याबाजारात जात असतांना पोलिसांनी पकडला, चालकावर गुन्हा दाखल,मुख्य रेशन माफिया मोकाटच,पुरवठा विभागाचा झोपेचा सोंग*

बुलडाणा –

शासकीय वितरण प्रणालीचे 600 कट्टे गहुचे घेऊन एक ट्रक काळ्याबाजारात जात असताना बाळापूर जवळ पोलिसांनी सदर ट्रक पकडून अनेक घडामोडीनंतर या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला मात्र या प्रकरणात मुख्य रेशन माफिया अद्याप तरी पडद्याआडच आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की बुलडाणा जिल्हा प्रशासनाने खामगाव शहराबाहेर साई जिनिंग भरड धान्य ज्वारी व मका ठेवण्यासाठी भाड्याने घेतलेले आहे. मात्र हीच जिनिंग शासकीय धान्याच्या काळ्याबाजाराचा मुख्य केंद्र बनल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे. साई जिनिंग मध्ये भरड धान्य ज्वार व मकासह रेशनचा इतर धान्यही ठेवला जात आहे. या ठिकाणी काळ्या कृत्यसाठी अवैधपणे गहूची साठवणूक केली जात होती आणि हाच गहू व्यवस्थितपणे रेकॉर्ड मेंटेन करून अशा प्रकारे काळ्याबाजारात विकण्याचा गोरखधंदा सर्रासपणे सुरू असल्याचे समजते. काल 17 सप्टेंबर रोजी एपी 20 टीबी 4699 क्रमांकचा एक ट्रक खामगांव येथील साई जिनिंग मधून 600 कट्टे गहूचे भरून अकोल्याच्या दिशेने काळ्याबाजारात विकण्यासाठी निघाला परंतु बाळापूर जवळ मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्कॉडने सदर ट्रक साई ढाब्याजवळ थांबवून ट्रकची झडती घेतली असता त्यात गहु आढळून आले. चालकाला विचारपुस केल्यावर चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिले. जवळपास 2 तास प्रकरण फिक्सिंगचा प्रयत्न सुरु होता परंतु ही गोष्ठ अकोला एसपी जी.श्रीधर यांच्या कानावर पोहोचल्याने त्यांनी तात्काळ सदर ट्रक बाळापुर पोलीस ठाण्यात लावून गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने अनेकांचे “दात खट्टे” झाले व शेवटी रात्री उशिरा बाळापूर पोलीस ठाण्यात ट्रकचालक शेख जावेद शेख ख्वाजा वय 28 वर्ष रा. भंगारीपुरा, आदिलाबाद, तेलंगाना राज्य याच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियमची कलम 3, 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीकडून 600 कट्टे (30 टन) गहू किंमत 20 लाख रुपये तसेच 6 लाखाचा ट्रक असा एकूण 26 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

*वाहतूक ठेकेदार व गोदामपाल संशयच्या भोवऱ्यात*

खामगांव येथे रेल्वे लाईन असल्याने अगोदर पासून बुलडाणा जिल्ह्यासाठी शासकीय वितरण प्रणालीचा धान्य खामगांव येथील एफसीआयच्या धान्य गोदामातून संपूर्ण जिल्ह्यात वाटप केला जातो येथे मोठ-मोठे गोदाम असतांना प्रशासनाने भरड धान्य ज्वार व मका ठेवण्यासाठी “साई जिनिंग” भाडयाने घेतली.गरीबांचा गहु साई जिनिंग मध्ये आणून ईथूनच काळ्याबाजारात विकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. या अवैध कामात सर्वात अगोदर गोदामपाल व वाहतूक ठेकेदार यांची “मिलीभगत” असल्या शिवाय हे काम अश्यकच मानला जात आहे, त्यामुळे आता वाहतूक ठेकेदार गौरी इंटरप्राइजेज व गोदामपाल यांची चौकशी होने गरजेचे आहे.

*रेकॉर्ड मेंटेन करुन होते रेशन धान्यची काळाबाजारी*

वर्ष 2017 ते 2019 या तीन वर्षात बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेशन धान्याची तस्करी होत असताना पोलीस व महसूल विभागाने पकडले आहे. या चौकशीदरम्यान असे निष्पन्न झाले की अनेक ठिकाणी रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन केलेला असताना सुद्धा धान्याची काळाबाजार होत होती. काल बाळापूर येथे 600 कट्टे रेशन धान्य काळ्याबाजारात जात असताना पोलिसांनी पकडले आहे. बऱ्याच वर्षानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शासकीय धान्य गोदामातून अशा प्रकारे काळ्याबाजारात जाणारा रेशन धान्य पकडण्यात आल्याने जिल्हा पुरवठा विभाग हादरुन गेला आहे. मागील काही वर्षा अगोदरचे रेशन धान्य काळाबाजारीचे प्रकरण पाहिले तर असे लक्षात येते की शासकीय धान्य गोदामतून धान्याची काळाबाजारी करताना व्यवस्थितपणे रेकॉर्ड मेंटेन करून धान्याची आवक – जावक व्यवस्थित दाखविण्यात येते त्यामुळे जर एखादा वाहन पकडण्यात आला तरी रेकॉर्ड मेंटेन केलेला असल्याने प्रकरणाची चौकशी करणाऱ्यांना मैनेज करत “ऑल इज़ वेल” केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here