भूसंपादनाची कार्यालये येणार एकाच छताखाली!! स्वनिधीतून बांधण्यात येणारी पश्चिम विदर्भातील प्रथम इमारत;
बुलडाणा = जिल्हाधिकारी कार्यालयात तीन कोपऱ्यात असलेली आणि हजारो प्रकल्पग्रस्तांसह कर्मचाऱ्याना अड चणीची ठरनारी भूसंपादन विभागाची 3 कार्यालये लवकरच एकाच छताखाली येणार आहे! होय, मावळते भूसंपादन ( इ, व द,) भूषण अहिरे यांच्या अहिर्निश प्रयत्न व जिल्हाधिकारी एस, रामामुर्ती यांच्या पाठबळ, पाठपुरावा यामुळे जिखाधिकारी कार्यालय परिसरात टोलेजंग व देखणी प्रशासकीय इमारत उभी राहणार असून त्यात ही सर्व कार्यालये एकत्र थाटात नांदनार आहे, यावर कळस म्हणजे यासाठी शासनाला कवडीही खर्च करण्याचे काम नसून भूसंपादनाच्या स्व निधीतून ही प्रसाशकीय इमारत उभी राहणार आहे, अश्या पद्धतीने निर्माण होणारी ही पश्चिम विदर्भतील पहिली इमारत ठरणार आहे, *
नुकतेच सिंदखेड राजा येथे एसडीओ पदावर बदली झालेले मावळते उप जिल्हाधिकारी ( भूसंपादन) यांनी आपल्या कार्यकाळात जिगाव व अन्य प्रकल्पांच्या भूसंपादन व मोबदला वाटपाची कामे मोठ्या संख्येने मार्गी लावली, यातील नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या रकमेतून विभागास सोयी सुविधा शुल्क पोटी 3 टक्के रक्कम मिळते, यापोटी विभागाकडे तब्बल 20 कोटी 4 लक्ष इतकी घशघशीत रक्कम जमा होती, नुसत्याच पडून असलेल्या रकमेतून भूसंपादनच्या इमारत व दळणवळण, लसीका आणि मध्यम प्रकल्प या 3 कार्यलयासाठी टोलेजंग, देखणी आणि सर्व रेकॉर्ड जपू शकणारी सुसज्ज इमारत उभी राहू शकते, अशी संकल्पना अहिरे यांना सुचले, त्यांनी त्याचा प्राथमिक अभ्यास करीत नियम, शासकीय निर्णय यांचा अभ्यास करून ही बाब जिखाधिकारी यांच्या समक्ष मांडली, त्यांनी याला तात्काळ हिरवी झेंडी दाखवीत ‘ गो अहेड’ म्हटले, या 2 अभ्यासू अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने सार्वजनिक बांधकाम बुलडाणा चे कार्यकारी अभियंता यांनी आराखडा तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी अमरावती स्थित मुख्य अभियंता यांच्याकडे पाठविला, एस रामामुर्ती यांनी संपूर्ण प्रस्ताव प्रसाशकीय मंजुरीसाठी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडे सादर केला, तसेच या जोडगोळीने त्याचा सतत पाठपुरावा केला, *
*15 कोटींचा प्रस्ताव मंजूर*
दरम्यान त्यांचे भगीरथ प्रयत्न यशस्वी ठरले असून आयुक्तांनी 14 कोटी 92 लाख 36 हजार रुपयांच्या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले, आज संध्याकाळी आयुक्तांचे पत्र जिल्हाघिकारी कार्यालयास प्राप्त झाले, आहे