राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने देण्यात आले निवेदन
बुलडाणा प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकापुर्ववत ओ .बी. सी. आरक्षणाच्या धर्तीवर घ्याव्यात , केंद्र आणि राज्य शासनाच्या स्तरावर स्वतंत्र ओ. बी. सी. मंत्रालय स्थापन करा, पदोन्नती मध्ये ओ. बी. सी आरक्षण द्या.
नॉन क्रिलिमिय मर्यादा 20 लाख पर्यँत करा, ओ. बी.सी आरक्षणासाठी इंपेरिकल dada केंद्राने राज्याला द्यावा , 50 टक्के आरक्षण मर्यादा वाढविण्यासाठी केंद्राने संविधान दुरुस्ती करून तसे अधिकार राज्यांना द्यावे या व इतर मागण्या कडे लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज 22 सप्टेंबरला बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातुन राष्ट्रपती मा. श्री. रामनाथ कोविंद , पंतप्रधान मा. श्री.नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहेत बुलढाणा जिल्हाधिकारी रामामूर्ती यांना प्रा. डॉ. संतोषराव आंबेकर यांच्या नेतृत्वात ओ. बी. सी.च्या विविध न्याय मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रा. गणेश बोचरे जिल्ह्या उपाध्यक्ष , मा. श्री. अनंत लहासे ,प्रा. बलवान विणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.