एकाच वेळी अग्रवाल बंधूंच्या जालना आणि बुलडाणा येथील प्रतिष्ठानांवर आयकर विभागाचा छापा…
बुलडाणा शहरातील सराफा लाईन मधील उत्तम ज्वेलर्स या ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकला असून काल सायंकाळपासून ही कारवाई सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे…
मिळालेल्या माहितीनुसार जालना आणि अकोला येथील आयकर विभागाचे पथक काल दुपारीच बुलडाणा शहरात दाखल झाले असून काल सायंकाळपासून अग्रवाल यांच्या उत्तम ज्वेलर्स येथे आयकर विभागामार्फत तपास सुरू आहे, अग्रवाल यांची जालना येथे स्टील फॅक्टरी असून त्यामध्ये व्यवहारात तफावत असल्याच्या अंदाजवरून काल एकाच वेळी अग्रवाल बंधूंच्या प्रतिष्ठानांवर जालना आणि बुलडाणा येथे कारवाई सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे…
आणि या कारवाईला आयकर विभागाच्या अधिकारी श्रीमती जोग मॅडम यांनी दुजोरा दिला आहे…
या कारवाईमुळे बुलडाणा जिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात खळबळ उडाली आहे, त्यामुळे आता या कारवाईत काय घबाड बाहेर निघणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे… आणि बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील आयकर विभागाच्या रडारवर कोण आहे, हे पाणी देखील महत्त्वाचे असणार आहे…