रात्री पासून बुलढाणा जिल्ह्यात पावसाची संततधार नदी नाले दुथडी भरून वाहत आहे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे वाहतुक ठप्प ….
*Anchor* :
– बुलडाणा जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत तर अनेक प्रकल्प भरली असून येळगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढलीय.. त्यामुळे धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत.. तर त्यामुळे बुलढाणा – चिखली मार्गावरील येळगाव च्या पैनगंगा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रशासनाने वाहतूक थांबवली आहे.. शिवाय चिखली – खामगाव रस्त्यावरील पेठ येथील पुलवरवून ही पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूनी वाहतूक अडकली आहे..
वाहनांच्या लांबच लांब रांगा या रस्त्यावर लागले आहेत- तर नदीकाठावरील शेतात पाणी शिरल्याने शेतात उभ्या पिकांची नुकसान झालेय.. प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सावधान तेच इशारा दिलाय..